कोरेगाव : भावेनगर, ता. कोरेगाव येथे धनगर वस्ती आहे. भावेनगर हे धनगर लोकवस्ती असलेले गाव असून येथे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चालीरीती, पंरपरा पाळल्या जातात. त्यातीलच एक परंपरा गावातील बाबीर देवाला बकऱ्याचा बळी देवून यात्रा साजरी होत असते.
दरवर्षीप्रमाणे बुधवार दि. 22ऑक्टोबर रोजी भावेनगर येथे आनंदराव कोकरे कुटुंबीय बाबीर देवाची जत्रा करण्यासाठी मंदिरात गेले होते.
त्याठिकाणी त्यांच्याच भावकितील संदिप गणपत कोकरे, प्रकाश रामभाऊ कोकरे, शामराव दगडू कोकरे, विजय सोमनाथ कोकरे, विनायक रामभाऊ कोकरे, तात्याबा शामराव कोकरे, वैभव विनायक कोकरे, बाबुराव बापुराव कोकरे, भिमराव दगडू कोकरे, विशाल विनायक कोकरे, राहुल भिमराव कोकरे, गौरव संदिप कोकरे, आबाजी बापुराव कोकरे, कबाजी बापुराव कोकरे, दत्तात्रय हिंदुराव कोकरे, सौ. छाया तात्याबा कोकरे, सौ. लक्ष्मी सोमनाथ कोकरे, सौ. मंगल प्रकाश कोकरे, शिवाजी तात्याबा कोकरे, सुशांत राहुल कोकरे, अविनाश प्रकाश कोकरे, समाधान प्रकाश कोकरे, बापुराव मारुती कोकरे, मनिषा संदिप कोकरे, सुमल विनायक कोकरे, तानाजी मारुती कोकरे, अमोल तानाजी कोकरे (सर्व रा. भावेनगर) यांनी आपण किती दिवस वेगवेगळ्या जत्रा साजऱ्या करणार असा जाब विचारत आनंदराव कोकरे यांचा मुलगा संतोष त्याची पत्नी निलम, भाऊ धनाजी, भाऊजय अक्काताई, पुतण्या उत्तम व करण यांना शिवीगाळ दमदाटी करत मारहाण केली. फिर्याद संतोष कोकरे यांनी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात दिली आहे.