सातारा : उत्तेकर नगर मध्ये अज्ञात चोरट्यांनी 25 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 ते 18 दरम्यान उत्तेकर नगर, सदर बाजार, सातारा येथील एका महिलेच्या बंद असलेल्या राहत्या घरामध्ये खिडकीचे ग्रील तोडून प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा 25 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.