सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिंब ता.सातारा येथून शुभम राजेंद्र शेळके (वय 24) हा युवक मित्राच्या लग्नाला जातो, असे सांगून घरातून गेला. मात्र तो परत आला नाही. ही घटना दि. 23 जून रोजी घडली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.