सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास सदर बाजार येथे पंढरपूर, जि. सोलापूर येथील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अविनाश माधव धोत्रे रा. सदर बाजार, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.