सातारा : चक्री जुगार प्रकरणी सातारा पोलिसांनी तीन जणांवर कारवाई करत सुमारे 42 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी सातारा तालुका पोलिसांनी शेंद्रे गावच्या हद्दीत कारवाई करत आसिफ दस्तगीर पठाण रा. मंगळवार पेठ, सातारा यांच्याकडून 14 हजार 840 रुपयांचे जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे.
शेंद्रे येथीलच दुसऱ्या कारवाईत, मोसिन समीर बागवान रा. शनिवार पेठ, सातारा याच्याकडून 12 हजार 970 किंमतीचे रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे.
तिसऱ्या कारवाईत, शाहूपुरी पोलिसांनी सातारा शहरातील करंजे नाका परिसरातून जयदीप पोपटराव जाधव रा. वाढे, ता. सातारा यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 14 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.