सातारा : महिलेस दमदाटी केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 जुलै ते 9 ऑक्टोबर दरम्यान संगमनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेस केस माघारी घेण्याबाबत दमदाटी केल्याप्रकरणी नितीन बसवेश्वर म्हमाने आणि अण्णा शेडगे दोघेही रा. शंकरगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावंजी करीत आहेत.