सातारा : सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले हे सोमवार दि.३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पंचायत समिती जावली (मेढा) येथे जावली तालुका विकास गटाकडील शासकीय विभागांच्या योजनांचा विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत. तसेच आगामी काळात प्रस्तावित करावायाच्या विकास कामांचा आढावा घेतला जाणार आहे.
सदर सभेसाठी जिल्हा स्तरावरील सर्व यंत्रणांचे प्रमुख तसेच जावली तालुका स्तरावरील सर्व विभागांचे अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तरी सदर आढावा सभेस जावली तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती चे सर्व आजी माजी अधिकारी,पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचात स्तरावरील सर्व संस्थांचे अधिकारी,पदाधिकारी व नागरीकांना या सभेस उपस्थित राहण्याबाबत प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे.