सातारा : दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कास ते सातारा रस्त्यावर यवतेश्वर, ता. सातारा येथे धोकादायरीत्या केटीएम दुचाकी (एमएच 11 डीआर 0071) चालवल्याने दुचाकी स्लिप होवून रस्त्याच्या बाजूच्या लोखंडी पाईपवर पडली. ही घटना दि. 31 ऑक्टोबरला घडली. दुचाकीचालक शुभम नवनाथ पवार (वय 23, रा. सदरबझार, सातारा) हा जखमी झाला असून, पाठीमागे बसलेला त्याचा मित्र सुरज दत्ता गाडे (वय 24, रा. गुरुवार पेठ, सातारा) याच्या डोक्यास गंभीर जखम झाली. उपचारास दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. याबाबत प्रतीक संभाजी ननावरे (वय 24, रा. राजसपुरा पेठ, सातारा) याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शाहूनगरात स्कॉर्पिओची दुचाकीला धडक; स्कॉर्पिओ चालकावर गुन्हा दाखल
October 25, 2025
नुने येथे शतपावली करताना एकास दमदाटी व मारहाण
October 25, 2025
विनयभंगाच्या दोन घटनेत चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
October 25, 2025
घरासमोर जेसीबी उभा केल्याच्या कारणावरुन मांडवे येथे एकास मारहाण
October 25, 2025