इस्त्राईलच्या वाणिज्य दुतांनी घेतली बीव्हीजीचे चेअरमन गायकवाड यांची भेट

by Team Satara Today | published on : 29 November 2024


पुणे : इस्त्राईलचे पश्चिम भारतातील वाणिज्य दुत कोब्बी शोशानी यांनी बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांची नुकतीच बीव्हीजी मुख्यालयात भेट घेतली. भेटी दरम्यान बीव्हीजी कार्यरत असलेल्या सुविधा व्यवस्थापन, कृषी, आरोग्य, प्रक्रीया उद्योग व न्युक्लीअर तंत्रज्ञान या विविध क्षेत्रांची सविस्तर माहिती या वेळी गायकवाड यांनी शोशांनी यांना दिली.

इस्त्राईल व भारताचे विविध क्षेत्रातील द्विपक्षीय संबध मजबुत करण्यासाठी बीव्हीजीचे योगदान  महत्वपुर्ण असल्याची प्रतिक्रीया शोशानी यांनी या वेळी व्यक्त केली.

कृषी व आरोग्यक्षेत्रात बीव्हीजीने  केलेल्या संशोधनाचा त्याचबरोबर सुविधा व्यवस्थापन व न्युक्लीअर तंत्रज्ञानाचा दोन ही  देशाला फायदा होणार आहे. अगामी काळात अंतरराष्ट्रीय प्लेसमेंट, इस्त्राईली तंत्रज्ञानाचा वापर बीव्हीजीची अंतरराष्ट्रीय क्षमता वाढवण्यासाठी करणार असल्याची प्रतिक्रीया गायकवाड यांनी नोंदवली आहे.

बीव्हीजीची आंतरराष्ट्रीय भरारी
भारत विकास गृपचा (बीव्हीजी) जगभरात विस्तार होतो आहे. अमेरिके सारख्या प्रगत देशात बीव्हीजी सेवा पुरवत आहे. आगामी काळात इस्त्राईल सारख्या कृषी प्रधान देशात सुद्धा बीव्हीजी सेवा पुरवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
म.फुले स्मृतिदिनापासून व्याख्यान माला सुरू !
पुढील बातमी
जिल्हाभर संविधान जागराचे आणि सन्मानाचे कार्यक्रम होणार !

संबंधित बातम्या