बनावट चांदीचे दागिने विकून फसवणूक करण्याचा प्रयत्न; दुकानदाराच्या सतर्कतेमुळे महिला बोरगाव पोलिसांच्या ताब्यात

by Team Satara Today | published on : 01 July 2026


सातारा : नागठाणे (ता. सातारा) येथे बनावट चांदीचे दागिने विकून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला दुकानदाराच्या सतर्कतेमुळे बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित महिलेसह आणखी एका पसार महिलेवर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल केला आहे. नफिसा बानू अन्सारी (रा. डोराई रोड, बेगून, जि. चित्तोडगड, राजस्थान) असे संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अजित विलास ताटे (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे.

सोमवारी दुपारी नफिसा ही नागठाणे येथील चौंडेश्वरी ज्वेलर्समध्ये सुमारे १९७ ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण मोडीत विकण्यासाठी आली होती. दागिन्यांची तपासणी करताना ते बनावट असल्याचे दुकानदार अजित ताटे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बोरगाव पोलिसांना याची माहिती दिली.

याचवेळी तिच्या साथीदार महिलेने शेजारील अनिल घाडगे यांच्या ज्वेलर्समध्ये ९८ ग्रॅम वजनाचे बनावट पैंजण मोडीत देऊन सुमारे ९ हजार रुपये घेतले आणि तेथून पसार झाली. याची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नफिसा हिला ताब्यात घेतले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संततधार पावसामुळे महाबळेश्वर बसस्थानकाच्या छताचा भाग कोसळला; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
पुढील बातमी
ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील १२० गावे व ४०३ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा - कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांची माहिती

संबंधित बातम्या