सातारा : मुलगी अल्पवयीन आहे, हे माहित असताना तिच्यावर लॉजमध्ये अत्याचार केल्याप्रकरणी मयुर विठ्ठल बोराटे (वय 20, रा. सर्जापूर ता.वाई) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, पिडीत मुलगी गेल्या काही दिवसांपासून घाबरुन राहत होती. कुटुंबियांना संशय आल्यानंतर तिला विश्वासात घेवून चौकशी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले. वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचा अहवाल आला. यामुळे पोलीस ठाण्यात जावून संशयित युवका विरुध्द तक्रार देण्यात आली. दरम्यान, ही घटना नेमकी कधी व कुठल्या लॉजमध्ये घडली हे मुलीला माहित नाही.