'कॉन्फीडन्स', 'ती' पाटी सोशल मीडियावर व्हायरल; राजेंद्रसिंह यादव यांच्या समर्थकांनी केली नगराध्यपदाची पाटी तयार

by Team Satara Today | published on : 08 December 2025


सातारा : कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीतर्फे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव हे उमेदवार म्हणुन निवडणुक रिंगणात होते. येथील नगरपालिकेच्या मतदानाचा निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार आहे. तत्पुर्वीच राजेंद्रसिंह यादव यांच्या समर्थकांनी त्यांच्या नावाची लोकनियुक्त नगराध्यपदाची पाटी तयार करुन ती काहीकाळ त्यांच्या कार्यालयात ठेवली होती. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून कराडचा उल्लेख होतो. या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल नऊ वर्षानंतर निवडणुक झाली. त्यामुळे यावेळी निवडणुक ही रंगतदार झाली. यावेळी निवडणुक आयोगाने जारी केलेल्या निवडणुक कार्यक्रमाप्रमाणे उमेदवारांना चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराला अवघेच पाचच दिवस मिळाले. त्यामुळे नेत्यांसह उमेदवारांनी पायाला भिंगरी लावुन मतदारांपर्यत पोहचण्याचा प्रयत्न केला.

यावेळच्या निवडणुकीत भाजपचे नेते आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कमळाच्या चिन्हावर तर आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हाताच्या पंजावर उमेदवार उभे केले. तर माजी सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी आणि माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांची यशवंत विकास आघाडी यांनी एकत्रीतपणे निवडणुक लढवली. त्या दोन्ही आघाडीचे यादव हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते. शहरातील १५ ब प्रभागातील मतदान २० डिसेंबरला होणार आहे तर २१ डिसेंबरला सर्व मतदानाची एकत्रीत मोजणी होणार आहे. त्याची उत्सुकता सर्वांना लागुन आहे. मात्र तत्पुर्वीच लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र यादव यांच्या समर्थकांनी त्यांच्या नावाची लोकनियुक्त नगराध्य़पदाची पाटी तयार करुन ती काहीकाळ त्यांच्या कार्यालयात ठेवली. त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यामुळे त्याचीच चर्चा सध्या शहरात सुरु आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानावरील चहापानावर विरोधकांचा बहिष्कार?; विरोधी पक्ष नेत्यांशिवाय विरोधकांची कसोटी लागणार
पुढील बातमी
कबीरावरील संशोधनाने नवीन दृष्टी मिळाली - डॉ. मानसी लाटकर, थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत व्याख्यान

संबंधित बातम्या