सातारा : पालवी चौक, गोडोली येथे कर्तव्य सोशल ग्रुप सातारा आणि नंदादीप आय हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत नेत्रचिकीत्सा व मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचा लाभ शेकडो रुग्णांनी घेतला. या शिबिरात सुमारे २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली तर २६ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना सांगली येथे पाठवण्यात
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व कर्तव्य सोशल गृप च्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, गोडोली येथील सामाजिक कार्यकर्ते रवी पवार मित्र समूह यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. सलग ८ व्यांदा झालेल्या या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर, अमर मोकाशी, रवी पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक व्यंकटराव मोरे, नगरसेवक शेखर मोरे पाटील, विलास कासार, दीपक भोसले, दिलावर शेख, महेश गार्डे, महेश यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोळीबार मैदान रणरागिणी ग्रूपच्या वैष्णवीताई कदम, पूनमताई निकम, रुपालीताई घाडगे, संगीताताई जाधव, प्रियाताई नाईक, शंकरराव जगताप, चंद्रकांत मोरे, चेतन जाधव, रोहित खुस्पे पाटील, बंटी सुर्वे, राजू नारायण मोरे, पोपट मोरे नांगरे पाटील, मोहित खुस्पे, रमेश वैदू गुरुजी, संतोष घुले, प्रकाश घुले, मारुतीअप्पा निकम, सुनील जाधव, शहाजी जाधव, इनामदार, गौरव जाधव आदी उपस्थित होते.
शिबिरात सहभागी झालेल्या गरजूंना ऑपरेशन व पुढील उपचारासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या वतीने सांगली येथे नंदादीप आय हॉस्पिटल येथे मोफत वाहनाने नेण्यात आले.