सातारा : सातारा शहरामध्ये युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोगरवाडी तालुका सातारा येथील तरुणाच्या विरोधात शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सौरभ राजेंद्र निकम असे संशयित तरुणांचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याप्रकरणी या पीडित युवतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीप्रमाणे दिनांक 31 जुलै रोजी दुपारी दोन वाजता राजवाडा ते समर्थ मंदिर रोडवर गोल मारुती मंदिर परिसरात निकम याने फिर्यादीची गाडी अडवून मला तुझ्याशी बोलायचे आहे आत्ताच्या आत्ता तू चल, असे म्हणून फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादीने त्याला विरोध केल्याने निकम यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. पोलीस हवालदार वाभीगार अधिक तपास करत आहेत.