सातारा : सातारा शहरातील मल्हारपेठ येथे जुन्या भांडणाच्या वादातून झालेल्या मारहाणीची घटना उघडकीस आली आहे. कक्कैया मैदान परिसरात संतोष सारंग त्रिंबके (रा. मल्हारपेठ) यांनी आदर्श विनायक शिंदे याला शिवीगाळ, दमदाटी करत लोखंडी रॉडने डोक्यात प्रहार केला. या हल्ल्यात शिंदे गंभीर जखमी झाले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमीच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरूdन गुन्हा नोंदवण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत.