सातारा : जबरी चोरी प्रकरणी दोनजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खासगी पिकअपमधून प्रवास करत असताना पहाटे पिकअप चालक व क्लीनर यांनी प्रवासी असलेल्या दोघांना मारहाण करुन जबरी चोरी केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. सुनीलकुमार विश्वनाथ गर्जे (वय 35, रा. कल्याण, मुंबई) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 11 डिसेंबर रोजी घडली आहे. तक्रारदार व त्यांचे मित्र रणजित पटेल यांना वर्ये ता.सातारा गावच्या हद्दीत मारहाण करत रोख 1500 रुपये, मोबाईल असा जबरदस्तीने चोरुन नेला आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सदरबझार येथील विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा
November 05, 2025
नोकरीच्या अमिषाने फसवणूकप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याच्या पतीवर गुन्हा
November 05, 2025