सातारा : महिलेसह भावाला शिवीगाळ केल्याप्रकरणी एकजणावर सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पतीच्या इलेक्ट्रीक कामाचे पैसे मागितले म्हणून एकाने महिलेसह तिचा भावाला शिवीगाळ केली. हा प्रकार दि. 10 रोजी गोडोली येथील साईबाबा मंदिराजवळ घडला. याप्रकरणी कोमल शेखर पवार (वय 30, रा. गोडोली) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अकील रमजान शिकलगार (रा. गोडोली) याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.