सातारा : सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून संपूर्ण जगात वेद पठणामध्ये जागतिक दर्जाचे अलौकिक असे कार्य करणाऱ्या दोन नामवंत वेदमूर्तींचा सत्कार श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. येत्या 9 जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र येथे हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे (वय २० वर्षे) यांनी(श्री शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखा दण्डक्रम पारायणकर्ते) दण्डक्रम विक्रमादित्य । दण्डकम त्रिविक्रम। दण्डक्रम वाचस्पति । शुक्लयजुर्वेदालंकार । शुक्लयजुर्वेद हरीशः श्री जगद्गुरु शंकराचार्य यांच्याकडून सुवर्ण कङ्कण प्राप्त । श्री ब्रह्मचैतन्य गुरुकुल द्वारा रजत दण्ड प्राप्त केले आहेत.
तसेच वेदमूर्ती श्रीनिधी स्वानंद धायगुडे (वय २० वर्षे) यांनी(श्री ऋग्वेद कंठस्थ घनपारायण कर्ते) ऋग्वेद धनसूर्य । त्ऋग्वेद कलानिधी । ऋग्वेद निधी । श्रीकरपात्ररत्न आधी महत्वाचे पठण केले असून या विशेष पदव्या प्राप्त केल्या आहेत.
वेदमूर्तींचे सत्कार सोहळ्यानिमित्त तत्पूर्वी या दोन्ही वेदमूर्ती भव्य शोभायात्रा व मिरवणूक सायंकाळी चार ते साडेपाच या वेळेत देवी चौक सातारा येथून भव्य रथातून काढण्यात येणार आहे. त्यानंतर ही शोभायात्रा समर्थ सदन येथे आल्यावर वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले व समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाहक योगेश बुवा रामदासी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे .अधिक माहितीसाठी प्रवीण कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे अशी माहिती कार्यवाह योगेश बुवा रामदासी यांनी दिली आहे
शाहूनगरीत पहिल्यांदा अशा द्विजोत्तमांचा सन्मान सोहळा आणि शोभायात्रा आयोजित केली आहे.सर्व हिंदुनी या शोभायात्रेला आणि सन्मान सोहळ्याला उपस्थित राहून आपल्या वैदिक आणि सनातन धर्माचे कौतुक करण्यास हजर रहावे ही विनंती समर्थ सेवा मंडळाचे वतीने करण्यात आली आहे .तसेच ज्या संस्थांना सन्मान सोहळा कार्यक्रम अंतर्गत सत्कार करायचे असतील त्यांनी दि. ७ जानेवारी तारखेच्या आत संपर्क करावा असेही आवाहन प्रवीण मुकुंद कुलकर्णी,विश्वस्त,श्रीसमर्थ सेवा मंडळ,सज्जनगड,भ्रमणध्वनी - ९८२२६३५९०२ यांनी केले आहे.