सातारा : छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी मी मुस्लिम मावळा म्हणत शहरातून छत्रपती सन्मान ज्योत यात्रा काढून अभिवादन केले. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती काल शहरातील विविध मंडळांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. काल सायंकाळी मुस्लिम समाजाच्या वतीने ही छत्रपती सन्मान ज्योत यात्रा काढली.
या यात्रेत मी मुस्लिम मावळा असे बॅनर असलेली वाहने सहभागी झाली होती. मुस्लिम समाजातील युवकांनी पोवई नाक्यावरून या यात्रेस सुरुवात केली. पोवई नाक्यावरून राजपथावरून नगरपालिका, अदालत वाडा या मार्गे यात्रा समर्थ मंदिर येथे गेली. समर्थ मंदिरातून राजधानी टॉवर त्यानंतर शाहू कला मंदिरमार्गे ही यात्रा पुन्हा गांधी मैदान येथे आली. तेथे सांगता झाली.