नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती वोलोडिमिर जेलेंस्की यांच्या निमंत्रणावरुन 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात पीएम मोदी आणि जेलेंस्की संरक्षण, आर्थिक संबंध आणि सायन्स-टेक्नोलॉजी सहकार्यावर चर्चा करु शकतात. भारताने रशियाकडून जी संरक्षण उपकरणं विकत घेतली आहेत, त्यातील बहुतेक उपकरण युक्रेनमध्ये बनवण्यात आली आहेत. यात अशी अनेक उपकरणं आहेत, ज्यांच अजून युक्रेनमध्ये निर्माण होतं. भारतीय नौदलाच्या युद्धनौकांसाठी गॅस टर्बाइन इंजिन आणि इंडियन एअर फोर्सच्या AN -32 विमानांचा यामध्ये समावेश होतो.
गॅस टर्बाइन इंजिन निर्मितीसंदर्भात युक्रेनची भारताच्या प्रायवेट कंपनीसोबत बोलणी सुरु आहे. काही वर्षांपूर्वी भारताने युक्रेनच्या STE सोबत मिळून 105 AN-32 विमानांचा ताफा अपग्रेड करण्यासाठी त्यांची लाइफ लाइन 40 वर्षापर्यंत वाढवण्यासाठी 400 मिलियन डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली होती. या प्रोजेक्टला भरपूर विलंब झाला. AN-32 विमानांचा ताफा 2028-2029 पर्यंत अपग्रेड करण्याची इंडियन एअरफोर्सची योजना आहे. या एयरक्राफ्टमध्ये युक्रेन आणि रशियामध्ये निर्मिती झालेले इवचेंको AI-20DM इंजिन आहे. त्याशिवाय जोर्या-मशप्रोक्टवर 2022 मध्ये रशियाने मिसाइल हल्ला केला होता. युक्रेनच्या गॅस टरबाइन इंजिनवर अवलंबून असलेल्या भारताला याचा फटका बसला होता.
भारत आणि युक्रेन मिळून गॅस टर्बाइन इंजिन बनवण्यावर विचार करु शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युक्रेन दौरा डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये भारत-युक्रेनमध्ये परस्पर सहयोगाच्या दिशेने एक पाऊल असू शकतं. युक्रेन दौऱ्यावर पीएम मोदी राष्ट्रपती जेलेंस्कीची भेट घेतील. याआधी तीन वेळा ते जेलेंस्कीना भेटले आहेत. पीएम मोदी यांनी 8-9 जुलैला रशियाचा दौरा केला होता. 22 व्या भारत-रशिया वार्षिक सम्मेलनात रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |