लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यांशी खेळणाऱ्यांना बेड्या ठोका

'आयएसी' अध्यक्ष हेमंत पाटील यांची मागणी

पुणे : स्पर्धा परिक्षांसंदर्भातील एक धक्कादायक ऑडियो क्लिप सध्या समाज माध्यमांवर फिरतेय. लाखो विद्यार्थ्यांच्या मनात या क्लिप मुळे संभ्रम निर्माण झाला आहे.  व्हायरल झालेल्या या व्हॉट्सअॅप ऑडिओ कॉलमध्ये तथ्य असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंतपाटील यांनी शुक्रवारी (ता.३१) व्यक्त केले.

 ४० आणि ३५ लाख रूपये देवून एमपीएसीची प्रश्नपत्रिका देण्याची बतावणी करणाऱ्या या टोळीचा तत्काळ बंदोबस्त करणे आवश्यक आहे. यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांनानिवेदन देणार असल्याचे देखील पाटील यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केले. एमपीएसी पेपर फुटीचे प्रकार अद्याप तरी महाराष्ट्रात घडलेले नाहीत. पंरतु, वायरल होणाऱ्या व्हिडिओचीसत्यता पडताळण्याची गरज आहे. पेपर फुटीचे प्रकार महाराष्ट्रातही होत असतील, तर राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशखालोखाल महाराष्ट्राचेही नाव कुप्रसिद्ध होईल, अशीभीती पाटील यांनी व्यक्त केली. 

तथाकथित व्हायरल व्हिडिओनंतर एमपीएसीने भूमिका स्पष्ट करीत प्रश्नपत्रिका   सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी आयोगावर विश्वास ठेवावा, असे आवाहन पाटीलयांनी केले.२ फेब्रुवारीला राज्यात होणाऱ्या गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पुर्व परिक्षेसंदर्भात समाज माध्यम आणि प्रसिद्धी माध्यमांवर सुरू असलेले वृत्त चिंताजनक असून, एमपीएसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. असे असले तरी असा प्रकार करणाऱ्यांना जेरबंद करणे आवश्यक असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

मागील बातमी
सातारा कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा
पुढील बातमी
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये भीषण अपघात

संबंधित बातम्या