सातारा : जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोनजणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढे फाटा येथे शहर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी 1630 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. किरण प्रल्हाद देखणे (वय 50, रा.वाढे ता.सातारा) व अमितकुमार विश्रांत माने (वय 48, रा.वाढे) या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.