सातारा : राज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी, धोरणात्मक निर्णय ठरविण्यासाठी व या विषयी उद्योजकांना बळकटी मिळावी यासाठी असलेल्या भारताच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या महाराष्ट्र राज्याच्या समितीवर महाराष्ट्राच्या राज्य उपाध्यक्षपदी म्हणून साताऱ्यातील युवा उद्योजक अक्षय बोराटे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच व्यावसायिकांकडे व बँकांकडे या उद्योगांसाठी आवश्यक पाठपुरावा करणे यासाठी कार्य करणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग उच्चाधिकार समितीच्या महाराष्ट्र बोर्डावर साताऱ्यातील युवा उद्योजकाला स्थान मिळाले आहे. यात अक्षय बोराटे यांची निवड केली असल्याने त्यांचा नुकताच दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप मिश्रा यांनी सत्कार केला.
निर्मिक कॉर्प प्रा.लि.कंपनी प्रॉपर्टी सोल्युशन्सच्या व्यवसायात गेली १० वर्ष कंस्लटिंग मध्ये काम करत आहे. ग्रामीण व शहरी भागातील व्यवसायाचा अनुभव असलेल्या अक्षय बोराटे यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून राज्यभर उद्योजकांचा संपर्क वाढवला आहे. या निवडीमुळे लवकरचं ते राज्यव्यापी दौरा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या MSME योजनेचा सामान्य व्यावसायिकांना कशाप्रकारे लाभ होईल यावर ते लक्ष ठेवून असणार आहेत. या निवडीचा राज्यभरातील उद्योगांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखिल अक्षय बोराटे यांनी या निवडीच्या निमित्ताने सांगितले.
तर अक्षय बोराटे हे युवा उद्योजक असल्याने महाराष्ट्र एमएसएमई पीसीआईचे कार्य ते अतिशय चांगले पार पाडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 'एमएसएमई' च्या माध्यमातून 'हर घर रोजगार, हर हात को काम' असा संकल्प सोडला आहे. त्यानुसार राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप मिश्रा हे देशभरात योजना राबवित आहेत. तसेच महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांना ते नक्की या पदाच्या माध्यमातून न्याय देतील अशी आम्हाला खात्री असल्यानेच त्यांच्यावर राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे प्रदीप मिश्रा यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष संजीव पांडे तसेच सर्व राज्याचे अध्यक्ष उपस्थित होते.