सातारा : शहरातील रविवार पेठेत केलेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील एक विवाहिता रविवार पेठेतील एका मंडळाच्या येथे दांडिया खेळत असताना नितीन पांडुरंग सोडमिसे (रा. रविवार पेठ, सातारा) हा तेथे आला व त्याने तक्रारदार महिलेच्या गळ्यातील 18 हजार रुपये किंमतीचे मनी मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून घेऊन पळून गेला आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत.
रविवार पेठेतील चेन स्नॅचिंग प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 15 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा