सातारा : गळफास घेवून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. 18 ऑगस्ट रोजी घडली. गळफास घेतल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबियांनी तिला तात्काळ सिव्हीलमध्ये नेले. मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.