सातारा : आईस मारहाण केल्याप्रकरणी मुलाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संगीता अशोक नलवडे राहणार मंगळवार पेठ सातारा या राहत्या घरात झोपलेले असताना त्यांचा मुलगा मयूर अशोक नलवडे हा दारू पिऊन आला. घरात आल्यानंतर त्याने संगीता नलावडे यांना शिवीगाळ करत त्यांना दगडाने मारहाण केली. तसेच जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वाघ करीत आहेत.