विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात 8 ते 9 मेपर्यंत पावसाचा इशारा; वातावरणात बदल

by Team Satara Today | published on : 06 May 2026


पुणे : देशातील सुमारे 60 टक्के भागावर पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याने वातावरण थंड होत आहे. पारा 44 करून 38 ते 40 अंशांपर्यंत खाली आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात फक्त कोकण, विदर्भात उष्णतेची लाट सक्रिय असून, उर्वरित भागाचे तापमान किंचित घटले आहे. दरम्यान, विदर्भवगळता संपूर्ण राज्यात 8 ते 9 मेपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पुन्हा एकदा वातावरणात बदल झालेला आहे. सरासरी कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट झाली आहे. बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 8 ते 9 मेपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्याचे तापमान - वर्धा 43.5, अमरावती 42.8, बुलडाणा 37.7, ब्रह्मपुरी 42.2, चंद्रपूर 42, गोंदिया 38, नागपूर 40.4, अकोला 42.5, मुंबई 34.8, अलिबाग 37.5, रत्नागिरी 34.5, पुणे 37.2, अहिल्यानगर 39.4, कोल्हापूर 36.9, महाबळेश्वर 30.9.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुष्काळी कामांच्या अनियमिततेवरून अनिल देसाईंचा प्रशासनावर हल्लाबोल; उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा
पुढील बातमी
साताऱ्यात कर्मवीरांच्या स्मृतींना होणार अभिवादन; रयत शिक्षण संस्थेचा ९ मे रोजी भव्य कार्यक्रम

संबंधित बातम्या