मंगळवारी साताऱ्यात 'मौसम प्यार का' गाण्यांचा कार्यक्रम; दीपलक्ष्मी पतसंस्था व सुहाना सफर सिंगर क्लबतर्फे आयोजन

by Team Satara Today | published on : 17 May 2026


सातारा : येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व सुहाना सफर सिंगर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 19 मे रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे मौसम प्यार का हा गाण्यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमामध्ये निसर्ग, मौसम, नदी, संध्याकाळ, फुले यांचा उल्लेख असणारी अनेक सुमधुर गाणी सादर केली जाणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजेश कोरपे, स्मिता कोरपे, काका पाटील, शिरीष चिटणीस, विजय साबळे, मुकुंद फडके उपस्थित राहणार आहेत.

निर्मिती व संकल्पना विजय साबळे यांची असून या कार्यक्रमामध्ये डॉ. सुनील पटवर्धन, चंद्रशेखर बोकील, सचिन शेरकर, शिवकुमार डॉ. सुहास पाटील, मिलिंद हर्षे, हेमंत मांडवे, मंजुषा पोतनीस, ममता नरहरी, स्मिता शेरकर, कविता शिवकुमार, दिपाली घाडगे, तरन्नूम शेख, चंदकला चंद, रेवती बंड, सुनिता किर्दत, श्रुती बेंद्रे, सुवर्णा लखपती हे गायक कलाकार गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. स्नेहल कुलकर्णी करणार असून ध्वनी व्यवस्था अक्षता व सचिन शेवडे सांभाळणार आहेत.

सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरेगावात दुकान मालकाच्या घरावर कामगाराचा डल्ला; सव्वा पाच लाखांचा ऐवज लंपास
पुढील बातमी
तरडगाव परिसरात वादळ आणि वाऱ्यामुळे मोठे नुकसान; भैरवनाथ गोपालन संस्थेच्या गोशाळेचे पत्रे उडाले

संबंधित बातम्या