गोडोलीत खुल्या जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 17 October 2026


सातारा : गोडोली येथील रेखांकनातील खुल्या जागेवर परवानगी न घेता बांधकाम केल्याप्रकरणी रविकुमार साजणे (रा. शिवशक्ती हौसिंग सोसायटी, विलासपूर, गोडोली) यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा नगरपालिकेच्या वतीने विश्‍वास लक्ष्मण गिरीगोसावी यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, संबंधित जागेवरील बांधकामाबाबत साजणे यांना यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. तसेच मुख्याधिकार्‍यांसमोरील सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, ते सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत.
यानंतर नगरपालिकेकडून अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची नोटीस देण्यात आली. तरीही बांधकाम हटविण्यात आले नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास हवालदार जाधव करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरातील गोडोली नाका परिसरातील वाहतुकीत बदल; नागरिकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे
पुढील बातमी
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चारजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या