जुन्या औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये लोखंडी साहित्याची चोरी

by Team Satara Today | published on : 30 August 2024


सातारा : जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये असणार्‍या कृष्णराज मेडिकल कंपनी येथे अज्ञाताने 70 हजार रुपये किंमतीच्या लोखंडी साहित्याची चोरी केली आहे. 
या प्रकरणी विशाल त्रिंबक जागले रा. कस्तुरबा हॉस्पिटल शेजारी, पंचपाळी हौद, राजवाडा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वा एकच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने स्टोअर मध्ये ठेवलेले 70 हजार रुपये किंमतीची कॉपर वायर, मशीनचे जॉब, ऍल्युमिनियम स्क्रॅप मटेरियल तसेच अन्य साहित्याची चोरी केली. पोलीस हवालदार एस. आर. भिसे अधिक तपास करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
जुन्या भांडणाच्या रागातून युवकाला मारहाण

संबंधित बातम्या