सातारा : कास रस्त्यावर यवतेश्वर येथील हॉटेल किनाराजवळ दि २५ रोजी दारू पिऊन धिंगाणा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश विश्वनाथ सावंत (वय २३. रा. हमदाबाद,ता.जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.भर दुपारी सव्वा वाजता दारूच्या नशेत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पोलीस हवालदार मालोजी चव्हाण यांनी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कास रस्त्यावर यवतेश्वर येथे दारू पिऊन धिंगाणा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 27 January 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा