सातारा : गेल्या वर्षभरापासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयाचा कार्यभार पुन्हा एकदा डॉ. अंशुमन धुमाळ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दहा महिन्यांपूर्वी डॉ. संपदा मुंडे या महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे त्यांची फलटणहून इतर ठिकाणी बदली करण्यात आली होती. हा कार्यभार पुन्हा डॉ. धुमाळ यांच्याकडे देऊन आरोग्य प्रशासन पुन्हा त्याच घटना घडवू इच्छिते का ? का त्यांच्याकडे दुसरा कोणताच डॉक्टर उपलब्ध नाही ? या प्रश्नाची उत्तरे प्रशासनाने जनतेला देणे आवश्यक आहे. अशी मागणी सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा राजेघोरपडे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबतचे निवेदन अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांनी स्वीकारले. फलटण उपजिल्हा रूग्णालयात आता कोणतीही अनुचित घटना, प्रकार घडल्यास आता जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. याची नोंद प्रशासनाने घ्यावी असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जिल्हा शल्यचिकित्सकांची पूर्णवेळ नियुक्ती करावी
तसेच सातारा जिल्हा रुग्णालय गेल्या पाच महिन्यांपासून प्रभारी शल्य चिकित्सकांद्वारे चालवले जात आहे. हे नेमके कशासाठी ? आरोग्य विभागाने लवकर लवकर पूर्णवेळ जिल्हा शल्यचिकीत्मक नेमावा. नाहीतर त्यासाठी काँग्रेस पक्ष जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला
फलटण उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. अंशुमन धुमाळ यांचा चार्ज काढून घ्यावा - सुषमा राजेघोरपडे
by Team Satara Today | published on : 07 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा