कोरेगाव तालुक्यातील पेठ किन्हई येथे घरफोडीत 86 हजाराचा मुद्देमाल लंपास

by Team Satara Today | published on : 10 November 2025


सातारा  : पेठ किन्हई ता. कोरेगाव येथे पहाटे पाच ते साडेपाच च्या दरम्यान घराचा दरवाजा उघडा राहिल्याचा फायदा घेऊन अज्ञाताने कपाटातून सोन्याचे गंठण रोख रक्कम असा 86 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लांबवला.

हेमा मुकुंद होळ (वय 49) यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पंताची किन्हई येथे एसटी स्टँड समोर फिर्यादी होळ यांचे घर आहे. पहाटेच्या वेळी उघड्या दरवाजातून अज्ञात चोरट्याने आत येऊन कपाटाच्या लॉकरमधील छोट्या ड्रॉवर मधील पावणेतीन तोळे वजनाची सोन्याचे गंठण मिनी गंठण व रोख रक्कम असा 86 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पोलीस हवालदार ए. के. शिंदे तपास करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहर परिसरात बेकायदा दारू विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
शिवथर येथे घरामध्ये एकाचा झोपेतच मृत्यू

संबंधित बातम्या