साताऱ्यात मोटारसायकलवरून चेन स्नॅचिंग, महिलेचे ७५ हजाराचे मंगळसूत्र हिसकावले

by Team Satara Today | published on : 18 April 2026


सातारा : रामनगर येथील हिना बंगल्याच्या समोर दि. १६ रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चैन स्नॅचिंगची घटना घडली आहे.

यामध्ये फिर्यादी महिला वैशाली सुनील दळवी (वय ५५,रा.साई कॉलनी,अमरलक्ष्मी, संभाजीनगर, सातारा) या घरी जात असताना रामनगर येथील हिना बंगल्याच्या समोर ही घटना घडली. मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी महिलेच्या बाजूने पुढे जाऊन अचानक मोटारसायकल वळवून तिच्या समोर अडवले.

यानंतर आरोपींनी फिर्यादीजवळ येत तिच्या गळ्यातील सुमारे ७५ हजार रुपये किंमतीचे, अंदाजे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र ओढून हिसकावून घेतले. घटनेनंतर दोन्ही आरोपी मोटारसायकलवरून भरधाव वेगाने देगाव रोडच्या दिशेने पसार झाले. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहर पोलिसांचा जुगाराच्या अड्ड्यावर छापा; १, ७७० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त
पुढील बातमी
पाच तालुक्यांची तहान भागवणाऱ्या धोम-बलकवडी धरणात 38 टक्के पाणीसाठा;' पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार

संबंधित बातम्या