सातारा : महाबळेश्वर येथे झालेल्या वादाचा राग मनात धरून चौघांनी सातार्यातील बुधवार पेठेत एका तरुणाच्या घरात घुसून मारहाण केली. प्लॅस्टिकच्या खुर्चीने डोक्यावर प्रहार करून तरुणाला जखमी करण्यात आले. गुरुवारी (दि. 30) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
आकाश भरत खरात (वय 35, रा. बुधवार पेठ) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आकाश हे बाथरूमला जाण्यासाठी घराबाहेर आले असता निलेश साबळे, साहिल कांबळे, तेजस कांबळे आणि अभी कांबळे यांनी त्यांना अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अभी याने खुर्ची डोक्यात मारली, तर तेजस याने तुटलेल्या खुर्चीने पायावर प्रहार केला. संशयितांनी घरात घुसून त्यांना बाहेर ओढत पुन्हा मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आई मालन यांनाही धक्काबुक्की केली. घराबाहेरील पत्र्याच्या शेडचे नुकसानही केले. चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
महाबळेश्वरमधील भांडणाचा सातार्यात वचपा; बुधवार पेठेत घरात घुसून तरुणावर हल्ला
by Team Satara Today | published on : 31 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा