सातारा : सातारा जिल्हयात दुचाकी वाहनांसाठी दि. 18 नोव्हेंबर पासुन एम एच 11 डी वाय 0001 ते 9999 ही नवी मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्यांना आपल्या वाहनास आकर्षक क्रमांक घ्यायचे आहेत त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधुन आपले आकर्षक क्रमांक फी भरुन आरक्षित करुन ठेवावेत. तसेच दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा संदिप खडसे यांनी कळविले आहे.
पंसतीचा नोंदणी क्रमांक देण्याकरीता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार नोंदणी क्रमांक काटेकोरपणे नेमून देण्यात येईल. अर्जासोबत विहित पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकीत प्रत सादर करणे आवश्यक राहील. अर्जदाराने त्याचे स्वत:चे ओळखपत्र उदा. आधारकार्ड, निवडणूक आयोग ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड यांची सांक्षाकित प्रत तसेच वाहनचालकाचा वैध ई-मेल आयडी, वैध मोबाईल नंबर, पिन कोड नंबर देणे बंधनकारक राहिल. 18 नोव्हेंबर रोजी जे वाहनधारक वाहनासाठी तिप्पट फी भरुन दुचाकी वाहन मालिकेतील वाहन क्रमांक घेण्यास इच्छुक आहेत त्यांचे चारचाकी वाहनांचे एल एम व्हि अर्ज सकाळी 10 ते 2 दोन वाजेपर्यंत धनाकर्षासह स्विकारले जातील. ज्या आकर्षक क्रमांकासाठी एकच अर्ज प्राप्त झाला असेल त्यास त्याच दिवशी आकर्षक क्रमांक देण्यात येईल. मात्र एकापेक्षा जास्त अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणीक्रमांकासाठी अर्ज केला असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेचा धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करावा. जो अर्जदार जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल.
दि. 20 नोव्हेंबर रोजी आकर्षक क्रमांकासाठी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत धनाकर्षासह अर्ज स्विकारले जातील. मात्र एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केल्यास अर्जदारांनी कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेचे धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करावा. सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्यास आकर्षक क्रमांक देण्यात येईल. उर्वरित अर्जदारांना धनाकर्ष त्वरीत परत देण्यात येईल. आकर्षक क्रमांक आरक्षित केल्यानंतर १८० दिवसाच्या आत वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा संदिप खडसे यांनी कळविले आहे.