महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिवपदी अ‍ॅड. कमलेश पिसाळ

by Team Satara Today | published on : 21 October 2024


सातारा : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अ‍ॅड. कमलेश पिसाळ यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी ते अंतरिम सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांच्यानिवडीवर सर्व सदस्यांनी पूर्ण विश्वास आणि पाठिंबा दर्शवला.


वार्षिक सर्वसाधारण सभेआधी झालेल्या अपेक्स कौन्सिल बैठकीत श्री. अजिंक्य जोशी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी  म्हणून बढती देण्यात आली. यापूर्वी ते मुख्य संचालन अधिकारी म्हणून कार्यरत होते. असोसिएशनच्या कामकाजात दिलेल्या योगदानासाठी आणि वाढीसाठी घेतलेल्या पुढाकारांची दखल घेत त्यांना ही बढती देण्यात आली आहे.


एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी श्री. पिसाळ आणि श्री. जोशी यांचे अभिनंदन केले आणि महाराष्ट्र क्रिकेटच्या आगामी काही वर्षांसाठी धोरणात्मक प्राधान्यक्रम मांडले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा मुख्य उद्देश सर्व इउउख प्रमुख स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणे आणि सर्व वयोगटांमध्ये विजय मिळवणे आहे. उच्च गुणवत्ता असलेल्या खेळाडू घडवून आणि क्रिकेटसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा तयार करून आम्ही भक्कम पायाभूत व्यवस्था उभारण्यास कटिबद्ध आहोत. आमचा उद्देश फक्त स्पर्धा करणे नाही, तर जिंकणे आहे. तसेच मला विशेष अभिमान आहे की महाराष्ट्राच्या तेजल हसबनीस यांची न्यूझीलंडविरुद्ध होणार्‍या आगामी मालिकेसाठी भारतीय महिला संघात निवड झाली आहे, असे श्री. पवार म्हणाले.


श्री. पवार यांनी महाराष्ट्राच्या क्रिकेट व्यवस्थेला आणखी बळकट करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सादर केला. पायाभूत सुविधा आणि खेळाडूंच्या विकासावर असलेला दुहेरी भर महाराष्ट्राला भारतीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाची शक्ती म्हणून प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. या नियुक्त्या आणि ध्येयवादी योजनांसह असोसिएशनने यशस्वी आणि स्थिर प्रगतीच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत.या धोरणात्मक बदलांसह आणि सशक्त नेतृत्वाची उपस्थिती, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राज्यातील क्रिकेटचे भविष्य घडवण्यास, तसेच महाराष्ट्र क्रिकेटला यशाचे शिखर गाठण्यासाठी कटिबद्ध असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणं वेळीच ओळखा सावध व्हा!
पुढील बातमी
नामनिर्देशन प्रक्रियेला आजपासून सुरवात

संबंधित बातम्या