राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन

याशनी नागराजन यांनी धरला गरब्याचा ठेका

by Team Satara Today | published on : 08 October 2024


सातारा : शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट व जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आयोजित राजधानी रास दांडियाचे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यासिनी नागराजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रास दांडियाच्या पहिल्या दिवशी परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी नागराजन यांनी स्वतः उस्फूर्तपणे महिलांमध्ये सहभागी होत गरब्याचा ठेका धरला.

सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी रास दांडिया कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर सिद्धीताई पवार यांनी उत्तरोत्तर महिलांसाठी असेच कार्यक्रम घ्यावेत. सिद्धीताईंसारख्या ऍक्टिव्ह महिला तुमच्या इथे आहेत म्हणून असे कार्यक्रम होतात आणि त्याला एक सातत्य असल्यामुळे आपल्या सगळ्यांचा आनंद पहिल्याच दिवशी इतका सुंदर आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आणि सिद्धी ताईंचे विशेष अभिनंदन, असे गौरवोदगार त्यांनी काढले. महिलांसोबत त्यांनी राजधानी रास दांडिया चा ठेका धरून महिलांचा आनंद द्विगुणित केला.

याप्रसंगी सौ. समताताई घोरपडे, सक्सेस अबॅकस चे श्री व सौ पाटील, बरवाज कॉस्मेटिकच्या जोगळेकर, संयोगिता माजगावकर, नगरसेविका दीपलक्ष्मी नाईक, भा ज पा चे सातारा शहर अध्यक्ष विकास गोसावी, भा ज पा चे प्रवासी कार्यकर्ते बेळगावहून आलेले जाधव, विस्तारक वाळुंजकर तसेच भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात
पुढील बातमी
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती

संबंधित बातम्या