नागठाणे येथे दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर बोरगाव पोलिसांचा छापा; तिघांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 26 June 2026


सातारा : नागठाणे गावातील दोन ठिकाणी सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर बोरगाव पोलिसांनी धाड टाकून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी तिघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २५ जून रोजी सरकारी दवाखान्याजवळ तसेच क्लासिक टेलर दुकानाच्या पाठीमागे काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान दोन्ही ठिकाणांहून एकूण १,८४० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणी जाफर अलीसाहब नदाफ (४०), वैभव विजय साळुंखे आणि धनाजी भगवान मोहिते (४५, सर्व रा. नागठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुमित साळुंखे व धीरज महाडिक यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास बोरगाव पोलीस करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा रुग्णालयात ५० लाखांच्या रक्त घटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण; रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पचा स्तुत्य उपक्रम;
पुढील बातमी
लिंबाचीवाडी-नांदगाव मार्गावरील सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण; तिघांविरुद्ध बोरगाव पोलिसांत गुन्हा

संबंधित बातम्या