सातारा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश असतानाही आदेशाचा भंग केल्याप्रकरणी वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे बीम लाईट संदर्भात प्रतिबंधात्मक आदेश असतानाही दत्ता लक्ष्मण मोरे रा. दुधी, ता. कोरेगाव जिल्हा सातारा याने कमानी हौद, सातारा येथे शिवनगर गणेश मंडळासमोर मिरवणुकीत बीम लाईट लावून आदेशाचे उल्लंघन केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, साई गणेश सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ रविवार पेठ सातारा या मंडळासमोर बीम लाईट लावल्याप्रकरणी अजिंक्य लाईटचे मालक स्वप्निल भोसले रा. कोडोली, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक मोहिते करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत, ओंकार कुमार पाटील रा. पोखरशी, ता. वाळवा, जि. सांगली याने बाल गणेश मंडळ रविवार पेठ, सातारा या मंडळासमोर बीम लाईट लावून आदेशाचे उल्लंघन केले आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक गोळे करीत आहेत.