शिवसेना शहर कार्यालयात महिलांनी लुटले वाण

by Team Satara Today | published on : 06 February 2025


सातारा : संक्रांत, रथसप्तमी सप्ताह औचित्य साधून शिवसेना सातारा शहर कार्यालय व जिजामाता महिला विकास मंडळाच्यावतीने आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांनी वाण लुटले. या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत एकमेकींना संक्रांतीचे वाण व शुभेच्छा देत हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पाडला.

हिंदू धर्मात मकर संक्रांत सणाला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांत म्हणजे महिलांचा सण. मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंत हळदी कुकुंवाचा कार्यक्रम केला जातो. हा हळद कुंकू कार्यक्रम महिला एकमेकींना हळद कुंकू लावून तिळगुळ आणि वाण देऊन साजरा करतात. घरोघरी याचे उत्साहात आयोजन केले जाते. आणि एका चैतन्यमय वातावरणात हा हळद कुंकू कार्यक्रम रथसप्तमी पर्यंत सुरू राहतो. सातारा शहर कार्यालय व जिजामाता महिला विकास मंडळाच्यावतीने हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने परिसरातील सर्व महिला एकत्र आल्या होत्या. हळद कुंकू लावून, तिळगुळ वाटप करुण वाणांची आणि विचारांची लूट करुन हा सण महिलांनी उत्साहात साजरा केला. तिळगूळ व हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. अत्यंत सुंदर रांगोळी आणि सजावट याने वातावरण अगदी संक्रांतीमय झाले होते. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्ष मीनाक्षी मोरे,

शिवसेना महिला शहरप्रमुख डॉ रुपाताई लेभे, माजी नगरसेविका दिपाली, सोनाली संकपाळ, राजलक्ष्मी पाटणकर, रेश्मा घोरपडे, साळुंखे,समाजसेविका सुवर्णा ताई पाटील, सुरेखा यादव, शिल्पा माने, इंद्रायणी बचत गट अध्यक्ष सारिका यादव, मोनाली माने, स्नेहल मोरे, अर्चना भोसले, ज्योती राजपूत, गीते वहिनी, रोहिणी यादव, आदी परिसरातील महिला उपस्थित होत्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संजीवराजे, रघुनाथराजे यांच्या घरावर सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच
पुढील बातमी
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र

संबंधित बातम्या