साताऱ्यात जुगारप्रकरणी पाच जणांवर सातारा शहर आणि तालुका पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 15 October 2025


सातारा :  जुगार घेत असलेल्या पाच जणांवर सातारा शहर आणि तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.

करंजे, सातारा येथे शुभम सुधीर इंगवले (रा. करंजे) हा मंगळवारी (दि. 14) जुगार घेताना आढळला. त्याच्याकडून 920 रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. दुसरी कारवाई, नवीन एमआयडीसीतील अ‍ॅरिस्टोक्रॅट कंपनी चौकात ज्योतिराम कृष्णा कारंडे (रा. कोडोली, ता. सातारा) याच्यावर करण्यात आली. त्याच्याकडून 620 रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. तिसरी कारवाई, अजंठा चौकात हणमंत शंकर गायकवाड (रा. खिंडवाडी, ता. सातारा) याच्यावर करण्यात आली. त्याच्याकडून 1150 रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. चौथी कारवाई जिहे, ता. सातारा येथे एका हॉटेलच्या आडोशाला अर्जुन अशोक पवार (रा. जिहे) याच्यावर करण्यात आी. त्याच्याकडून 3102 रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. पाचवी कारवाई डबेवाडी, ता. सातारा येथे पोगरवाडी फाट्याजवळ ज्योतिराम लक्ष्मण शिंदे (रा. डबेवाडी) याच्यावर करण्यात आली. त्याच्याकडून 950 रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आरफळमधून 70 किलो तांब्याच्या तारेची चोरी; सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
साताऱ्यात बोगदा चौकात अपघातात एकास जखमी करून मारहाण; अपघात, मारहाणप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या