जागतिक ग्राहक दिनाचे 17 मार्च रोजी आयोजन

by Team Satara Today | published on : 14 March 2025


सातारा :   जागतिक ग्राहक दिनाचे 17 मार्च  रोजी दुपारी 1 वाजता  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या प्रसंगी ग्राहक संरक्षण कायदा-2019, ग्राहक चळवळ व सायबर गुन्हेगारी याबाबत मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विविध विभागामार्फत ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीपासून सावधानतेबाबत माहिती देणारे विविध शासकीय कार्यालयांचे स्टॉल्स, बॅनर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

तरी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बिबट्याचे कातडे विकण्यासाठी आलेल्या चंदगडच्या दोघांना अटक
पुढील बातमी
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

संबंधित बातम्या