जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या पाच दिवस अधिवेशनाला आज (दि. ४) प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० पुनर्संचयित करण्याचा प्रस्ताव 'पीडीपी'च्या आमदार वाहिद पारा यांनी मांडला. या प्रस्तावाला भाजपच्या आमदारांनी तीव्र निषेध केला. यानंतर विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला.
जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीचे आमदार वाहिद पारा यांनी कलम 370 मागे घेण्याचा प्रस्ताव मांडला. जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. विधानसभेत या प्रस्तावावरून भाजप आणि पीडीपी आमदारांमध्ये जोरदार वादावादी झाली. वाहीद पारा हे जम्मू-काश्मीरच्या पुलवामा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या या मागणीला त्यांच्या सहकारी आमदारांनीही पाठिंबा दिला होता.
कलम 370 मागे घेण्याच्या 'पीडीपी' आमदार वाहिद पारा यांच्या प्रस्तावाला भाजपने उघड विरोध केला . वाहिद पारा यांच्या प्रस्तावाच्या विरोधात भाजपचे सर्व 28 आमदार उभे राहिले आणि त्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. वहीद पारा यांनी असा प्रस्ताव आणून सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी भाजपचे आमदार लाल शर्मा यांनी केली आहे. मात्र, यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अब्दुल रहीम राथेर यांनी आमदारांना शांत राहण्याचे आवाहन केले. हा प्रस्ताव अद्याप माझ्याकडे आलेला नाही, असे सभापती अब्दुल रहीम राथेर यांनी म्हटले आहे. ते वाचूनच कोणताही निर्णय घेतला जाईल. भाजप आमदारांच्या निषेधादरम्यान नॅशनल कॉन्फरन्सचे आमदारही वेलमध्ये आले आणि त्यांनी भाजप आमदारांवर सभागृहाचे कामकाज व्यत्यय आणल्याचा आरोप केला. यामुळे काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
संगमनगर येथे घरफोडी; 56 हजारांचे दागिने लंपास |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |