उत्तर चिदंबरम नटराज मंदिराचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात ; शनिवार, दि. 3 जानेवारी रोजी नटराज- शिवकामसुंदरी देवीचा कल्याणोत्सव अर्थात लग्नसोहळा

by Team Satara Today | published on : 02 January 2026


सातारा : श्री आनंद नटराज व शिवकामसुंदरी या देवतांच्या कृपेने आणि श्री कांची कामकोटी पिठाचे महास्वामी परमपूज्य शंकराचार्य श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती स्वामी तसेच परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती व परमपूज्य विद्यमान पीठाधीपती श्री शंकर विजयेन्द्र सरस्वती स्वामी व त्यांचे शिष्य श्री श्री सत्यचंद्रशेखरेंद्र सरस्वती यांचे पूर्णानुग्रह आणि शुभाशीर्वादाने सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील सर्व देवतांचा वार्षिक रथोत्सव सोहळा संपन्न झाला.

आज  सकाळी भव्य अशा लाकडी सुंदर कोरीव काम केलेल्या रथात मूर्तिदान सोहळा संपन्न झाल्यावर वेदमूर्ती दत्ता शास्त्री जोशी, वेदमूर्ती जगदीश शास्त्री भट्ट गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील श्री आनंद नटराज, शिवकाम सुंदरी देवी, राधाकृष्ण, गणपती, हनुमान, उमादेवी अय्यप्पा, चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराज आदींच्या पंचधातूच्या मूर्ती वाजत गाजत रथामध्ये स्थापन करण्यात आल्या .त्यानंतर ब्रह्मवृंदांनी 108 भगवान शंकराची नावे घेऊन पुष्पांजली अर्पण केली . रथातील सर्व देवतांना पुष्पहार घालून सजविण्यात आले आणि नंतर दानपात्राचे यथाविधी लक्ष्मीस्तोत्र तसेच लक्ष्मी मंत्र म्हणून पूजन करण्यात आल्यावर या रथोत्सवाचे पूजनासाठी  श्री व सौ कार्तिकेयन, श्री व सौ   नागराजन .श्री. मुरली श्रीनिवासन व त्यांची सुविद्य पत्नी सौ. सुधा मुरली, ठाणे, मुंबई.जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे. नूतन नगरसेविका वैशाली प्रकाश राजेभोसले व प्रकाश राजेभोसले ,यांच्या शुभहस्ते या रथाचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नारळ फोडून तसेच पंचोपचार पूजा करून करण्यात आले. त्यानंतर वाजत गाजत ढोल ताशांच्या निनादात आणि सनईच्या मंगल सुरामध्ये हा भव्य रथ शेकडो नटराज भक्तांच्या उपस्थितीत संपूर्ण मंदिर परिसराला प्रदक्षिणा घालून सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक कडे मार्गस्थ झाला .मंदिरात रथ पूजनाच्या वेळी 51 सुवासिनी महिला हातात मंगल कलश घेऊन उभ्या होत्या . मिरवणुकीत अग्रभागी चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराजांची प्रतिमा असलेले वाहन तसेच स्वरसुगंध शहनाई पार्टी आणि ढोल ताशांचा दणदणाट लक्ष वेधून घेणार होता.फटाक्यांची आतषबाजी ठिकठिकाणी करण्यात येत होती .

या रथ मिरवणुकीमध्ये सातारा येथील के.एस.डी. शानभाग विद्यालय आणि महाविद्यालयाच्या कलाकारांनी वेदांची परंपरा सांगणाऱ्या अथर्ववेद ,सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद या वेदांचे सुरेख चित्रण केलेला रथ व त्या वेदांचे पारंपारिक ऋषी यांचा देखावा चित्ररथातून साकारला होता. हा चित्ररथ मिरवणुकीत अग्रभागी होता.

याप्रसंगी नटराज मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग , त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.उषा शानभाग, नारायण राव, सी .के. शहा, वासुदेव नायर व्यवस्थापक चंद्रन ,संकेत शानभाग , सौ कविता शानभाग, राहुल घायताडे, रमेश हलगेकर ,मोहनराव शानभाग,सौ.प्रभा भट,अभिनव भट, सुहास शहाणे ,सौ ,कांचन शहाणे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण सातारा शहरातून हा रथ नटराज मंदिरातून बाहेर पडल्यावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थानावरून साई मंदिर, गोडोली तेथून पोवई नाका, नगरपालिका चौक, कमानी हौद, देवी चौक मार्गे मोती चौकातून राजवाडा येथे येऊन त्यानंतर मोती चौकातून सदाशिव पेठ मार्गे, 501 पाटी ,शनिवार पेठ मार्गे पोलीस मुख्यालयावरून ,पोवई नाका येथे येऊन त्यानंतर कुबेर गणपती मंदिर मार्गावरून डीएसपी बंगला तसेच पुन्हा नटराज मंदिरात सायंकाळी सहा वाजता संपूर्ण शहरातून मिरवणूक पार पाडल्यानंतर मंदिर परिसरात आल्यावर महाआरती करून प्रसाद वितरण करण्यात आला .रथाचे मिरवणूक सोहळ्यात पोवई नाका येथे शिवाजी सर्कल परिसरात के.एस.डी.शानभाग हायस्कूल आणि जूनियर कॉलेजच्या मुलामुलींनी आकर्षक लेझीम तसेच ढोल पथकाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. 

सातारा शहरातून रथ मार्गक्रमण करताना ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पहार तसेच फुलांचा वर्षाव करून या देवदेवतांचे स्वागत केले. महिलांनी पंचारतीने औक्षण करून देवाचे पूजन केले. अनेक मान्यवरांनी या रथ मार्गावर देव, देवतांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिराच्या वतीने या सर्वांना प्रसाद वितरण करण्यात येत होता. या मिरवणुकीमध्ये अय्यप्पा सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सेवेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शनिवार, दि. 3 जानेवारी 2026 रोजी पहाटे पाच ते दुपारी बारा या वेळेत पुणे येथील राधाकृष्ण शास्त्री मेमोरियल ट्रस्टच्या वतीने श्री नटराज देवाला महाअभिषेक, लघुरुद्र व शिवकाम सुंदरी व नटराज यांचा कल्याणउत्सव अर्थात लग्नसोहळा संपन्न होऊन त्यानंतर आरती व महाप्रसाद वितरण होणार आहे .हा रथोत्सव मंदिराच्या वतीने जनता जनार्दनाच्या देणग्यांमधून केला जातो. सर्वांनी या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने तन- मन- धनाने सहभागी व्हावे व आनंद घ्यावा असे आवाहन नटराज मंदिर चे समस्त विश्वस्त ,रथोत्सव सेवा समितीचे सदस्य व व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग यांनी केले आहे


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक
पुढील बातमी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त लिंब शेरीत ६१ जणांचे रक्तदान

संबंधित बातम्या