जुनी एमआयडीसी येथे साडेतीन लाखाच्या फसवणूक प्रकरणी महिलेवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 27 December 2025


सातारा  : जुनी एमआयडीसी येथे एका महिलेने एका संस्थेची ३ लाख ५० हजारांची फसवणूक केली असून तिच्या विरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वप्नाली सतीश पिसाळ (रा. ५८ रविवार पेठ) यांनी एमआयडीसी येथे एका संस्थेची जाणीवपूर्वक साडेतीन लाख रुपयेची फसवणूक केली असून संस्थेचे गोपनीय व अतिशय खाजगी माहितीची अफरातफर केली आहे. त्याचप्रमाणे संस्थेला समाजात असलेल्या प्रतिष्ठेला ठेच पोचवली आहे. त्यामुळे संस्थेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक नुकसान झाल्याप्रकरणी कंपनीचे मालक सचिन यशवंत शिंदे (वय ४४ रा.  सदर बाजार) यांनी महिलेच्या विरोधात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अमोल मोहिते यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटीची अखेर, खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांची सोहळ्याला उपस्थिती
पुढील बातमी
सातारा नगरपालिकेच्या शेजारी पाण्याच्या टाकीजवळ गांजाचे सेवन करणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या