सातारा जिल्हा परिषदेत ४ एप्रिलला सभापती निवडी; गोंधळाची पुनरावृत्ती आणि प्रशासनाची नामुष्की टाळण्याचे आव्हान

by Team Satara Today | published on : 28 March 2026


सातारा :  जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण, समाजकल्याण आणि इतर दोन विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक येत्या ४ एप्रिल रोजी होणार असून, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. या पार्श्वभूमीवर २० मार्च रोजी झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती आणि  प्रशासनाची नामुष्की टाळण्याचे मोठे आव्हान आता जिल्हा प्रशासनासमोर उभे आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपने बहुमत नसतानाही अनपेक्षितपणे विजय खेचून आणला खरा, मात्र त्यावेळी झालेल्या गोंधळ आणि मंत्र्यामंत्र्यांमध्ये आणि पोलीस मंत्र्यांमध्ये जिल्ह्याची संपूर्ण राज्यामध्ये मोठी नाचक्की झाली. या संघर्षाची आग अजूनही शांत झालेली नसतानाच आता पुन्हा एकदा सातारा जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वनविभागाच्या वतीने ‘कचरामुक्त कास पठार’ उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता मोहीम; एनसीसी, हरित सेनेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
पुढील बातमी
काँग्रेसचे जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी जनसुनावणी अभियान; ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा

संबंधित बातम्या