मुंबई : अमेरिकेचे भारतातील महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. हँकी यांनी दावोस येथील गुंतवणूक करारांच्या यशासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्रात उद्योग उभारण्यासाठी अनेक अमेरिकन कंपन्या उत्सुक असल्याचे श्री. हँकी यांनी सांगितले. तसेच राज्यात ऊर्जा, नव तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, नवनवीन क्षेत्रामधील सहयोगाबद्दल चर्चा केली.
राज्यात ऊर्जा क्षेत्रात असलेली संधी, विकास आणि पायाभूत सुविधा उभारणीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी उद्योग विभागाचे सचिव पी.अनबलगन, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासु आदी उपस्थित होते.