सातारा : सातारा शहर परिसरातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरातून अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे दि. 27 रोजी अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बागवान करीत आहेत.
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहर परिसरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
by Team Satara Today | published on : 02 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा