सातारा : बसस्थानक परिसरातून अज्ञात चोरट्याने मंगळसूत्राची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 रोजी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान सातारा बसस्थानक परिसरात पाटण तालुक्यातील एका महिलेचे 55 हजार रुपये किंमतीचे मिनी मंगळसूत्र चोरल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.